|
नवी देहली – राजधानीतील रोहिणी येथे ‘सी.आर्.पी.एफ्. शाळे’जवळ २० ऑक्टोबरला झालेल्या बाँबस्फोटामुळे चांगलीच खळबळ उडाली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी हे आक्रमण धोकादायक षड्यंत्राकडे अंगुलीनिर्देश करत आहे. १९ ऑक्टोबरला विविध विमान आस्थापनांच्या उड्डाणांना ३० हून अधिक बाँबने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या गेल्याने बनावट धमक्या आणि दूरभाष यांची नवीन लाट आली आहे. यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचा दावा ‘मणीपूर रिसर्च ग्रुप’चे उपाध्यक्ष प्रा. माधव दास नलपत यांनी केला आहे. पायाभूत सुविधांना लक्ष्य करणार्या अशा घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा हा कट आहे. चीनचे नाव घेत प्रा. नलपत म्हणाले की, ड्रॅगनशी लढणार्या आस्थापनांना भारतात गुंतवणूक करायची आहे; परंतु अशा घटनांमुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण होत आहे.
पायाभूत सुविधांवर बाँबच्या धमक्यांद्वारे आक्रमणांचे भय दाखवण्यासमवेत रेल्वे रुळांवर सिलिंडर ठेवणे, रेल्वेवर दगडफेक आदी प्रकारही वाढले आहेत. यावरून भूराजकारणाचे प्रा. नलपत यांना वाटते की, अशा घटना भारताविरुद्धच्या मोठ्या कटाचा भाग आहेत.
प्रा. नलपत यांनी एका वाहिनीशी बोलतांना म्हटले की, वास्तविकता अशी आहे की, चीनपासून दूर जाणार्या आणि भारतात स्थायिक होणार्या आस्थापनांची संख्या वाढत आहे. भारताच्या विरोधकांना हा पालट आवडत नाही. त्यामुळेच ते देशाच्या सुरक्षेसंदर्भात विदेशी गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी ते विमान आस्थापने, रेल्वे मार्ग, शाळा आणि बरेच काही यांना लक्ष्य करत आहेत. गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून भारताचे आकर्षण अल्प करण्याचा हा प्रयत्न आहे.
संपादकीय भूमिकाहे राष्ट्रद्रोही कोण, हे जगजाहीर असून अशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असेच सर्वसामान्य हिंदु जनतेला वाटते ! |