
कोल्हापूर – ‘युवान’ ही मोहीम नसून युवकांना समाजसेवा, ग्रामविकास आणि राष्ट्रनिर्माण यांसाठी प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा देणारी चळवळ आहे. युवानच्या माध्यमातून युवकांनी ग्रामविकासाचे दायित्व स्वीकारत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल केली, तर बलशाली आणि विकसित भारताचे स्वप्न निश्चितच साकार होईल, असे विधान शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी केले. शिवाजी विद्यापिठात ‘युवान’ या राष्ट्रव्यापी युवक चळवळीच्या भित्तीपत्रकाचे कुलगुरु प्रा. डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.कुलगुरु पुढे म्हणाले, ‘‘युवान चळवळ युवकांना समाजोपयोगी कार्यात सहभागी करून नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव विकसित करणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतील.’’
या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु प्रा. डॉ. ज्योती जाधव, प्रा. डॉ. राजाराम गुरव, प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, युवानचे जिल्हाप्रमुख श्रेयस पानवलकर, शहरप्रमुख पुष्कर लाटकर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
१० वर्षे उलटूनही ‘सी.आय.डी.’ अहवाल गुलदस्त्यातच ?
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेणे हे सर्वांचे भाग्य ! – तनीकेल्ला भरणी
बनावट औषधे आणि इंजेक्शने विकणार्यांवर कारवाई होत नसल्याने सदस्य संतप्त !
छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचे खरे राष्ट्रपिता ! – श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले