डान्सबारमधील अश्लील नृत्याला प्रतिबंध घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

प्रतिकात्मक इमेज

  मुंबई, ३० जून (वार्ता.) – डान्सबार परवाना असेल, तर त्यामध्ये अनेक निर्बंध आहेत; परंतु ‘परफॉर्मन्स’ (सार्वजनिक सादरीकरणाचा) परवान्याच्या अंतर्गत मुलींना अश्लील पद्धतीने नाचवले जाते.  महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या अंतर्गत ‘परफॉर्मन्स’ परवाना घेतला जातो. या कायद्याच्या अंतर्गत अश्लील नृत्यासाठी पळवाटा शोधल्या जात आहेत. यामुळे कारवाईलाही अडचण येत आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनामध्येच या कायद्यात सुधारणा केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी ठाणे जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत ‘ऑर्केस्ट्रा बार’ चालू असून कारवाई होत नसल्याविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.