छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेणे हे सर्वांचे भाग्य ! – तनीकेल्ला भरणी

तनीकेल्ला भरणी

सोलापूर – औरंगजेबाच्या काळात कर भरू न शकणार्‍या रयतेची पिळवणूक केली जात होती. दीनदुबळ्या शेतकर्‍यांच्या स्त्रिया आणि मुले यांना पळवून नेण्याचे अमानुष प्रकार घडत होते. अशा अन्यायी राजवटीविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांनी बंड पुकारून रयतेच्या हितासाठी अनेक लढाया लढल्या. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली असून अशा थोर राजांच्या भूमीत जन्म घेणे, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे, असे मत प्रसिद्ध तेलुगू अभिनेते श्री. तनीकेल्ला भरणी यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळा’च्या वतीने ‘श्री शिवराज्याभिषेक’ या विषयावर त्यांचे तेलुगू भाषेत व्याख्यान आयोजित केले होते. त्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमास सर्वश्री रंगनाथ बंकापुरे, पुरुषोत्तम उडता, भाजपचे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, दामोदर देवसानी, उद्योजक मल्लिकार्जुन कमटम, गंगाधर गवसने, प्रा. देवानंद चिलवंत, धनंजय कुलकर्णी, प्रसाद जिरांकलगीकर, वरदराज बंग, उदय वैद्य आणि व्यवस्थापक मल्लिनाथ होटकर, माधवी कुलकर्णी, आदी उपस्थित होते आणि कवयित्री रेणुका बुधाराम यांनी सूत्रसंचालन केले.

आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराजांवर व्याख्याने देत रहाण्याचा निर्धार ! 

भरणी म्हणाले की, भारतीय युवकांना महाराजांचे कार्य समजावे, या उद्देशाने तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथेही मी तेलुगू भाषेत व्याख्याने देत आहे. जोपर्यंत माझ्यात प्राण आहेत, तोपर्यंत महाराजांच्या कार्याची महती सांगत राहीन.