रावेर (जिल्‍हा जळगाव) येथे पैशांच्‍या आमिषाद्वारे ऑनलाईन खेळात फसवणूक करणारी टोळी अटकेत !

जळगाव – जिल्‍ह्यातील रावेर येथे एका घरात काही लोक भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक यांच्‍या साहाय्‍याने ‘ऑनलाईन गेम अ‍ॅप’ सिद्ध करायचे आणि लोकांना पैशांचे आमीष दाखवून हा खेळ खेळण्‍यास सांगायचे. या प्रकरणी पोलिसांनी नागपूर येथील अभिषेक अनिल बानिक, खंडवा (मध्‍यप्रदेश) येथील साहिल खान वकिल खान, बलवीर रघुवीर सोलंकी, अंकित धर्मेंद्र चव्‍हाण, साहिद खान जाकिर खान, गणेश संतोष कोसल यांना अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून ९ भ्रमणभाष संच, २ भ्रमणसंगणक अशा एकूण १ लाख १५ सहस्र ७०० रुपयांच्‍या वस्‍तू कह्यात घेण्‍यात आल्‍या.

संपादकीय भूमिका

ऑनलाईन जुगारासारख्‍या खेळांवर सरकारने कायमस्‍वरूपी बंदी घालायला हवी !