जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीकडून कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनचे समर्थन !
ठाणे – जसे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बनले, तशाच प्रकारे (कुख्यात आतंकवादी) ओसामा बिन लादेनही बनला. (डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या प्रख्यात शास्त्रज्ञाची तुलना कुख्यात आतंकवाद्याशी करणे, ही बौद्धिक दिवाळखोरी नाही का ? – संपादक) हे जाणण्यासाठी त्याची जीवन कथा वाचा, असे राष्ट्रघातकी विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी एका कार्यक्रमात बोलतांना केले. (‘जीवन कथा कुणाची वाचावी ?’, हेही न कळणार्या ऋता आव्हाड ! – संपादक) ‘ओसामा बिन लादेन याला समाजाने मोठे केले’, असेही त्या या वेळी म्हणाल्या.
‘Read Osama bin Laden’s biography.’ – advises NCP leader, Jitendra Awhad’s wife Ruta Awad.
👉 Jitendra Awad has also met and consoled the family of J!h@d! #terrorist Ishrat Jahan, who was killed in an encounter a few years ago, and now his wife is promoting a dreaded terrorist’s… pic.twitter.com/AyHbDuiLzZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 26, 2024
संपादकीय भूमिकाजितेंद्र आव्हाड यांनीही काही वर्षांपूर्वी चकमकीत मारली गेलेली जिहादी आतंकवादी इशरत जहाँ हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि आता त्यांच्या पत्नी कुख्यात जिहादी आतंकवादी लादेनची जीवन कथा वाचण्यास सांगत आहेत. यावरून या कुटुंबाची मानसिकताच जिहादी आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? |