
मुंबई – धारावी येथे १५ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणार्या ६० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पॉक्सोच्या अंतर्गत या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१७ सप्टेंबर या दिवशी घरातील सर्व मंडळी श्री गणेशमूर्ती विसर्जनाला गेले असतांना अत्याचारी व्यक्तीने तोंडावर मास्क घालून अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करून तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. झालेल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तिच्या अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी त्याने मुलीला दिली. पालक विसर्जन मिरवणुकीतून आल्यावर मुलीने झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी धारावी पोलीस ठाण्यात वृद्धाच्या विरोधात तक्रार नोंदवली. पीडित मुलीने अत्याचार करणार्या व्यक्तीला ओळखले आहे.
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
आश्वासनांची पूर्तता गतीने होण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ करणार ‘सॉफ्टवेअर’ची निर्मिती !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !
महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवला
आग लावणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची मागणी