छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांधांनी बळजोरीने हिंदूचे कार्यालय बळकावले

दुकानमालकाला ‘सर तन से जुदा’ची धमकी !

छत्रपती संभाजीनगर – शहरातील रोकडिया हनुमान कॉलनीमधील पुष्कराज इमारतीत हिंदु व्यापारी बलजीत भरत सिंह पुनिया हे एक कार्यालय उघडून गेल्या ३५ वर्षांपासून ‘ए.बी.आर्. रोडवेज ट्रान्सपोर्ट’ या नावाने व्यवसाय करत आहेत. या दुकानावर नदीम शेख आणि अमीर शेख हे बळजोरीने ताबा मिळवून गॅरेजचा व्यवसाय करत आहेत, तसेच सिंह यांनी हे कार्यालय सोडून जावे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकून ‘तुम यहां से भाग जाओ नहीं तो सर तन से जुदा…’ (शीर धडापासून वेगळे करणे) अशी जिवे मारण्याची धमकी देत आहेत. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट असूनही पोलिसांनी याकडे कानाडोळा केला आहे. (हिंदुद्रोही पोलीस असे वागण्याचे धाडस कुणाच्या सांगण्यावरून करतात, हेही पहाणे आवश्यक ! – संपादक)

१. ५ ते ६ वर्षांपूर्वी हिंदु व्यापारी सिंह यांच्या कार्यालयासमोर रऊफ शेख गॅरेजचा धंदा करत होता. कोरोनाच्या काळात शेख याचा मृत्यू झाला. त्यानंतर रऊफ शेख यांचे भाचे नदीन अमीर शेख आणि मतीन अमीर शेख हे दोघे भाऊ रस्त्यावर गॅरेजचा धंदा करू लागले. कोरोनाच्या काळात व्यापारी सिंह ६ महिने गावी गेले होते.

२. ते परत आल्यानंतर नदीम शेख आणि मतीन शेख यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून ते कह्यात घेऊन स्वतःचे गॅरेजचे साहित्य ठेवल्याचे लक्षात आले, तसेच त्यांनी कार्यालय स्वतःचे असल्याविषयी खोटी कागदपत्रे सिद्ध करून सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला प्रविष्ट केला होता.

३. न्यायालयात सिंह यांनी योग्य कागदपत्रे दाखवल्यावर न्यायालयाने सिंह यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा आदेश दिला.

४. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी २ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद केला; परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. धर्मांध शेख यांनी ट्रान्सपोर्ट कार्यालयाचा अधिक ताबा मिळवला असून केवळ ३० चौरस फूट जागा सोडली आहे. (पोलीस केवळ गुन्हा नोंद करून काहीच करत नसल्यामुळे धर्मांध वरचढ होत आहेत आणि अधिक गुन्हे करण्यास प्रवृत्त होत आहेत ! – संपादक)

५. धर्मांधांनी कार्यालयाच्या दालनात जाण्यासाठी रस्ता न सोडल्याने कार्यालयात  त्यांच्या गॅरेजमधूनच जावे लागते. धर्मांध बाहेर जातांना कार्यालयाला कुलूप लावून जातात. त्यामुळे सिंह यांना कार्यालयाच्या दालनात जाता येत नाही.

६. प्रतिवर्षी कार्यालयात सिंह हे श्री गणेशमूर्तीची स्थापना करतात. यावर्षी त्यांनी श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. धर्मांध कधीही कार्यालयाला कुलूप लावून जात असल्यामुळे सिंह यांना वेळेत पूजा करता येत नाही. याविषयी पोलिसात तक्रार केलेली असूनही पोलिसांनी याविषयी काहीच केले नाही. शुक्रवारी संपूर्ण दिवस शटरला कुलूप लावले होते. (हिंदूंच्या धर्मपालनामध्ये मुद्दाम अडथळा आणणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

उद्दाम धर्मांधांना ‘तोडीस तोड’ उत्तर देण्यासाठी हिंदूंचे संघटन अपरिहार्य आहे !