|
(ख्वाजा म्हणजे स्वामी, मालक किंवा गुरु)
बलरामपूर (उत्तरप्रदेश) – महंमद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने बलरामपूर जिल्ह्यातील उट्रौला या मुसलमानबहुल बाजारपेठेत धर्मांध मुसलमानांनी मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक हिंदु व्यापार्यांनी उभारलेल्या गणेशोत्सव मंडपाच्या समोर आल्यावर धर्मांध मुसलमानांनी मंडपाच्या समोर थांबत हिरवे झेंडे फडकावले. त्या वेळी ‘भारतात राहायचे असेल, तर ख्वाजा ख्वाजा म्हणावे लागेल’ यांसह ‘रसूल के गुलाम को मौत भी कबुल है’(अल्लाच्या गुलामांना मृत्यू स्वीकारार्ह आहे), ‘पॅलेस्टिनी मुस्लिम झिंदाबाद’, ‘मस्जिद-ए-अक्सा झिंदाबाद’ (जेरूसलेम येथील मशीद) अशा घोषणा दिल्या. पोलिसांसमोर घोषणाबाजी करण्यात आली.
‘If you want to live in India, you need to say Khwaja Khwaja’. – Fanatical Mu$l!m$ pass slogans in front of the Ganesh Mandal during Eid Milad-un-Nabi procession
📍Balrampur (Uttar Pradesh)
▫️Police arrested bigots, but had to release them soon after.
👉 This is what Hindus… pic.twitter.com/1w6STgrPr6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 17, 2024
याच घटनेचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. पोलीस निरीक्षक संजय दुबे यांनी घोषणाबाजी करणार्यांपैकी काही जणांना पकडले; मात्र मुसलमानांनी त्यांना सोडण्यासाठी दबाव निर्माण केल्याने दुबे यांनी त्यांना सोडून दिले. (मुसलमानांसमोर नांगी टाकणारे पोलीस हिंदूंवर नेहमीच मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) मुसलमानांच्या या कृत्याच्या विरोधात सिद्धी विनायक सेवा समितीने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल भागात अल्पसंख्य हिंदूंची स्थिती ! हिंदुबहुल देशात अल्पसंख्यांक धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत. त्यांना सरकार कधी धडा शिकवणार ? |