३ जणांना अटक
गाझीपूर (उत्तरप्रदेश) – स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस रात्री गाझीपूर घाट स्टेशनवरून गाझीपूर सिटी स्टेशनकडे येत असतांना रात्री २.४० वाजता रेल्वे रुळाच्या मध्ये लाकडाचा तुकडा उभा असल्याचे पाहून चालकाने आपत्कालीन ब्रेक लावला. यानंतरही इंजिनमध्ये लाकडाचा तुकडा जाऊन अडकला.
🚨Ghazipur, Uttar Pradesh : A log placed on the railway track pierced into the engine of the train
📌Three people arrested
👉Those found guilty of such criminal acts should be sentenced to life imprisonment#TRAIN #UttarPradsh #CrimesAgainsHumanity #Crime #CrimeNews… pic.twitter.com/LfnuaDzGcT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 17, 2024
या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दानिश अन्सारी, सोनू कुमार आणि आकाश कुमार यांना अटक केली. तिघेही रात्री रेल्वे रुळावर गांजा ओढत होते. दारूच्या नशेत मौजमजेसाठी त्यांनी लाकडाचा तुकडा ठेवल्याचे आरोपींनी सांगितले होते.
संपादकीय भूमिकाया आरोपींना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे ! |