अमळनेर (जिल्‍हा जळगाव) येथे गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक !

  • गणेशमूर्तीचा हात दुखावला

  • मंडळाच्‍या अध्‍यक्षांना रात्री २ पर्यंत पोलीस ठाण्‍यात बसवून दमदाटी

  • प्रकरण दाबण्‍याचा पोलिसांचा प्रयत्न !

हात दुखावलेली मूर्ती येथे दिसत आहे.

हे छायाचित्र हिंदूंच्‍या भावना दुखावण्‍यासाठी नाही, तर हिंदूंना सत्‍य स्‍थिती कळावी म्‍हणून प्रसिद्ध केले आहे.

जळगाव, १६ सप्‍टेंबर (वार्ता.) – जिल्‍ह्यातील अमळनेर येथे १५ सप्‍टेंबर या दिवशी ‘दोस्‍ती ग्रुप गणेशोत्‍सव मंडळा’ची मिरवणूक चालू असतांना धर्मांधांनी या मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीमुळे श्री गणेशमूर्तीचा उजवा हात दुखावला.

गांधीलपुरा भागात मिरवणूक आली असता ही घटना घडली. हिंदूंनी गुलाल उधळल्‍याचे कारण देत दगडफे करण्‍यात आली. या घटनेनंतर मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांनी ‘जोपर्यंत दगडफेक करणार्‍या धर्मांधांना अटक करत नाही, तोपर्यंत मंडळाच्‍या वतीने गणेशमूर्तीची मिरवणूक पुढे नेणार नाही’, असा पवित्रा घेऊन ठिय्‍या आंदोलन केले.

पोलिसांची गणेशभक्‍तांना अन्‍याय्‍य वागणूक ! 

गणेशोत्‍सव मंडळाचे अध्‍यक्ष नितीन दाभाडे यांना पोलिसांनी रात्री २ वाजेपर्यंत पोलीस ठाण्‍यात थांबवून ठेवून दमदाटी केली. मूळ तक्रारीत दाभाडे यांनी १३ धर्मांधांची नावे दिली असूनही पोलिसांनी केवळ ५ नावे प्रथमदर्शनी अहवालात ठेवली. एवढेच नव्‍हे, तर ‘श्री गणेशमूर्तीचा हात हा धर्मांधांनी दगडफेक केल्‍याने दुखावला’ याचा उल्लेख न करता ‘गाडी स्‍पिड ब्रेकरवरून जातांना हात दुखावला’ असा धादांत खोटा उल्लेख करणे भाग पाडले. मूळ फिर्यादीत पालट करून पोलिसांनी गुन्‍ह्याची तीव्रता न्‍यून करण्‍याचा प्रयत्न केला. (एवढे गणेशभक्‍त प्रत्‍यक्षदर्शी असूनही पोलीस एवढा धादांत खोटेपणा करत असतील, तर एरवी काय करत असतील ? याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनी मिरवणुकीच्‍या रक्षणासाठी पथके सिद्ध करणे, हाच यावरील उपाय आहे ! मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे बंद होण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !
  • हे पोलीस पाकिस्‍तानातील आहेत कि भारतातील ? धर्मांधांच्‍या दृष्‍टीने पोलीसही काफीर आहेत, हे पोलीस जाणत नाहीत का ?
  • अशा खोटारड्या आणि हिंदुद्वेषी पोलिसांवर श्री गणेशाची अवकृपा होईल, असे कुणाला वाटले, तर ते चूक नव्‍हे !