
बदलापूर – येथे एका वाढदिवसाच्या मेजवानीत २२ वर्षीय युवतीवर बलात्कार झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. संबंधित तरुणी मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या मेजवानीला गेली. तिथे तिचे अन्य २ मित्रही होते. त्यांनी पुष्कळ मद्य घेतले. पीडित तरुणी घरी जाण्यास निघाली असता तिला उलट्या होऊ लागल्या; म्हणून तिला लिंबू पाणी देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले. त्यानंतर एका मित्राने तिच्यावर स्नानगृहात अत्याचार करून तो तिला अर्धनग्न अवस्थेत सोडून पळून गेला. मैत्रिणीने तिच्या आई-वडिलांना कळवले. त्यानंतर वडील तिला घेऊन आले आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली.
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
गेल्या २४ घंट्यांत विविध राज्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ९ घटना !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा