सामाजिक माध्यमांवर चुकीची छायाचित्रे प्रसारित झाल्याचे प्रकरण
सातारा, ८ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे आणि त्यांच्या निघणार्या मिरवणुका यांना व्यापारी वर्गाचा कोणताही विरोध नाही. सामाजिक माध्यमांवर जुनी छायाचित्रे प्रसारित करून काही अपसमज निर्माण करण्यात आले होते. ही छायाचित्रे बदलापूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करतांनाची आहेत. अपसमजातून हा प्रकार झाला आहे. त्याविषयी सातारा येथील व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने क्षमा मागत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन दिले आहे. सातारा शहरातील खण आळी परिसरातील व्यापार्यांनी पत्रकाद्वारे लेखी भूमिका समाजापुढे मांडली आहे. गत २-३ दिवसांपासून सर्वच गणेशभक्तांमध्ये व्यापारी वर्गाविषयी झालेला अपसमज दूर करण्याच्या दृष्टीने निवेदन दिल्याचे समजते.