महाराष्ट्रातील यवतमाळ येथे हिंदूंनी आर्थिक बहिष्काराची धमकी देताच मुसलमान नरमण्याची घटना घडली आहे. शहरात केदारेश्वर मंदिर परिसरात २ सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात साजर्या होणार्या ‘पोळा’ या सणाच्या पार्श्वभूमीवर ३ दिवसांची यात्रा भरते. येथील बाजारात ९० टक्के मुसलमानांची दुकाने असूनही ‘गुलशन-ए-रजा-ट्रस्ट’ या स्थानिक मुसलमान संघटनेने ‘मुसलमान महिलांना पोळ्याच्या निमित्ताने भरणार्या बाजारात खरेदीसाठी पाठवू नका. सध्या वातावरण खराब आहे. तिथे छेडछाडही होते’, अशा आशयाचे पत्रक वितरित केले.
याविषयी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी, ‘प्रतिवर्षी अनेक विधर्मी (मुसलमान) या बाजारात त्यांचा व्यवसाय करतात; परंतु त्याच्या आड हिंदु महिला आणि भगिनी यांची छेडछाड होण्याच्या घटना प्रत्येक वर्षी घडतात. हा सण हिंदु धर्मियांचा आहे. त्यामुळे हिंदु महिलांनी पोळ्यामध्ये खरेदीसाठी जातांना विशेष काळजी घ्यावी. यावर्षी पोळ्यात हिंदु बांधवांकडूनच खरेदी करावी. आपला सण आणि आपली माणसे जपावी. जो गोरक्षणासाठी झटतो, त्याच्याशी व्यवहार करून सण साजरा करावा; जेणेकरून आपली बहीण, आई, मुलगी सुरक्षित राहील’, अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले. हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात एक व्हिडिओही सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध केला. हिंदुत्वनिष्ठांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेनंतर गुलशन-ए-रजा-ट्रस्ट या संघटनेच्या महमंद इसाक शेख या अध्यक्षाने लगेचच, ‘सर्व हिंदू आणि मुसलमान बांधवांना विनंती आहे की, आम्ही मुसलमान महिलांना पोळ्याच्या बाजारात न जाण्याची विनंती केली होती. त्यात कुठल्या धर्माच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आमच्या या विनंतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही क्षमा मागतो’, अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सडेतोड प्रत्युत्तर आणि निवेदन दिल्याने मुसलमानांनी क्षमा मागून नरमाईची भूमिका घेतली. येथे हिंदूंचा सण असतांना मुसलमान महिला कशासाठी येतील ? अधिकतर हिंदु महिलाच यात्रेत असतात आणि त्यांचीच तेथे छेड काढली जाते. आतापर्यंत धर्मांधांकडूनच छेडछाडीच्या घटना अधिक प्रमाणात घडल्या आहेत. आतापर्यंत यात्रेत किंवा बाजारात मुसलमान महिलेची छेड कुणी काढल्याचे ऐकिवात नाही. यातून एक गोष्ट सिद्ध होते की, जेव्हा आर्थिक बहिष्काराचा विषय येतो, तेव्हा त्याला मुसलमान घाबरतो आणि नरमाईची भूमिका घेतो.
मुसलमानांची देशाप्रती निष्ठा संदिग्ध !
महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा डंका पिटणारे पुरोगामी, साम्यवादी आणि नास्तिकवादी एखाद्या मुसलमानावर अत्याचार झाला, तर लगेच त्याच्या बाजूने उभे राहून ‘देशात मुसलमानांना कसा धोका निर्माण झाला आहे ?’, अशी आवई उठवतात; मात्र हिंदूंवर आतापर्यंत अनन्वित अत्याचार झालेले असतांनाही त्याविषयी ते मूग गिळून गप्प बसतात. मुळात देश स्वतंत्र होण्यापूर्वीचा आणि झाल्यानंतरचा अभ्यास केला असता मुसलमानांची देशाप्रती असलेली निष्ठा संदिग्ध आहे, हे अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. वर्ष १८५७ ते १९४७ पर्यंत किती मुसलमानांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली ? अनेक मुसलमानांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होण्यास नकार दिला होता. देशासाठी भारतीय सैनिक हुतात्मा झाल्यास किती मुसलमान किंवा त्यांच्या संघटना त्याविषयी दुःख व्यक्त करतात ? काश्मीर खोर्यात सैनिकांवर दगडफेक करून आतंकवाद्यांना साहाय्य करणारे मुसलमान देशभक्त असू शकतील का ? उलट आतंकवाद्यांना आसरा देऊन आणि त्यांना साहाय्य करून भारतीय सैनिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यास तेथील धर्मांधांनी हातभार लावला आहे. याचसमवेत आतंकवादी संघटनांचे कार्य देशभर पसरवणे आणि देशात देशविघातक कृत्ये करून देशाचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करणे, यांसाठी अनेक धर्मांधांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी पकडले आहे. देशात हिंदूंच्या सण-उत्सवांसह इतर वेळी दंगली घडवणे, बाँबस्फोट करणे, लँड जिहाद, लव्ह जिहाद, हलाल पद्धत, वक्फ मंडळाचे भूमी बळकावण्याचे देशविघातक षड्यंत्र आदी पाहिले, तर धर्मांधांना देशातून हद्दपार करण्याविषयी सर्वत्र चर्चा चालू झाली आहे.
आर्थिक बहिष्कार हवाच !
‘मुसलमानांकडून काहीही न खरेदी करता त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घाला’, असे म्हणणे चुकीचे आहे, असे सांगितले जाते; मात्र ज्यांचे देशावर प्रेम नाही, जे दुसर्यांशी तुच्छतेने वागतात, इतर धर्मियांना ठार मारतात, अशा धर्मांध मुसलमानांविषयी दयामाया न दाखवता त्यांच्यावर बहिष्कार घालावा किंवा त्यांना देशातून हाकलून लावावे, असे कुणी म्हटल्यास त्यात वावगे काय ? कारण मुसलमानांनी त्यांच्या वर्तनाने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे, त्याला आम्ही काय करणार ? वर्ष २००९ मध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मुसलमानांनी गणेशोत्सवातील एका गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीवर दगडफेक करून दंगल घडवली होती. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बैठका घेऊन मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन हिंदूंना केले होते. हे आवाहन करताच मिरज येथील मुसलमान व्यापारी भयभीत झाले होते. यातून लक्षात येते की, धर्मांधांना धडा शिकवायचा असेल, तर आर्थिक बहिष्कार हे मोठे माध्यम आहे.
आर्थिक बहिष्काराद्वारे पाकला शिकवलेला धडा !
वर्ष २०१० मध्ये पाकिस्तानने देशात आतंकवाद्यांना पाठवून ताज उपाहारगृह, सी.एस्.टी. रेल्वेस्थानक येथे आक्रमण करून सहस्रो निष्पाप प्रवाशांना ठार मारले होते. त्या वेळी ताज उपाहारगृहाचे मालक रतन टाटा यांनी पाकिस्तानात टाटा आस्थापनांनी निर्माण केलेली वाहने पाठवण्यास बंद केले. तेथील सर्व ‘शोरूम’ बंद केले. पाकिस्तानने वारंवार विनंती करूनही त्यांनी तेथे वाहने पाठवली नाहीत. टाटा आस्थापनाने पाकवर बहिष्कारच घातला होता. याखेरीज वर्ष २०१४ मध्ये देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर पाकिस्तानात दूध, पालेभाजी, फळे या जीवनावश्यक वस्तू पाठवायचे बंद करण्यात आले. त्यामुळे तेथे पालेभाज्या आणि फळे यांची मोठी टंचाई निर्माण झाली. फळे, दूध, भाज्या यांचे शुल्क गगनाला भिडले. गेल्या काही मासांपासून पाकिस्तानातील लोक १ वेळ उपाशी रहात आहेत. तेथे अन्नासाठी लोकांची भांडणे होत आहेत. इतरांना लुबाडले जात आहे. चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारे मोदी यांनी पाकिस्तानवर आर्थिक बहिष्कारच घातला आहे. धर्मांधांच्या अनेक देशविघातक गोष्टींवर असाच बहिष्कार घातल्यास, ते वठणीवर येतील, हे त्रिवार सत्य आहे, असेच मानावे लागेल !
आर्थिक बहिष्काराद्वारे पाकला शिकवलेल्या धड्यातून शिकून भारतातील हिंदूंनी येथील देशविरोधी धर्मांधांना धडा शिकवावा ! |