मूडबिद्री (कर्नाटक) येथील घटना
मूडबिद्री (कर्नाटक) – एका युवतीला प्रेम करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकून मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अर्शद नावाच्या तरुणाला अटक केली.
मूडबिद्रीतील कोटेबागिल येथे भाड्याच्या घरात रहाणार्या अर्शदची कोटेबागिल परिसरातील एका युवतीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये अनेक वेळा दूरभाषवर संभाषण झाले. कोटेबागिलमधील युवती मूडबिद्री अल्वा रुग्णालयाच्या रस्त्यावर असलेल्या एका सौंदर्यप्रसाधनगृहामध्ये (ब्युटी पार्लरमध्ये) काम करत होती. अर्शदसमवेत झालेल्या संभाषणामुळे तिच्या घरच्यांनी तिला कामावर जाण्यापासून रोखले होते. या काळात तिला उडुपी येथे तिच्या बहिणीच्या घरी पाठवले होते. काही दिवसांपूर्वी ती गावात परतली होती. संध्याकाळी ती मूडबिद्री बाजारात गेली असतांना अर्शदने तिला अडवले आणि तिच्यावर आक्रमण केले. येथील पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अर्शद याला अटक केली.
संपादकीय भूमिकाअशांना आता फाशीची शिक्षा करा ! |