तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंता रेड्डी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !
नवी देहली – न्यायालय नेत्यांना विचारून नव्हे, तर कायद्यानुसार निर्णय घेते. आमच्या निर्णयांबद्दल नेते किंवा इतर कुणी काय म्हणतात, याने आम्हाला फरक पडत नाही. न्यायालयाला राजकीय वादात ओढणे चुकीचे आहे. एका मुख्यमंत्र्याच्या अशा वक्तव्यामुळे जनतेवर चुकीचा परिणाम होतो, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने तेलंगाणातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंता रेड्डी यांना फटकारले. देहली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना जामीन सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी म्हटले होते की, भाजप आणि भारत राष्ट्र समिती यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या करारामुळे के. कविता यांना अटकेनंतर ५ महिन्यांमध्येच जामीन मिळाला आहे. आपचे नेते मनीष सिसोदिया यांना मात्र १५ महिन्यांनंतर जामीन मिळाला होता.
Supreme Court Slams Telangana CM : Courts decide according to the law and not by calling upon political leaders !
Tough words by the Supreme Court for #Telangana Congress Chief Minister Revanth Reddy !#CongressFailedTelangana #TelanganaCongress pic.twitter.com/pY7e5azF5J
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 30, 2024
मुख्यमंत्री रेवंता रेड्डी यांची क्षमायाचना
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या विधानाविषयी सर्वोच्च न्यायालयाची ‘एक्स’वर पोस्ट करत क्षमा मागितली आहे.
I have the highest regard and full faith in the Indian Judiciary. I understand that certain press reports dated 29th August, 2024 containing comments attributed to me have given the impression that I am questioning the judicial wisdom of the Hon’ble Court.
I reiterate that I am…
— Revanth Reddy (@revanth_anumula) August 30, 2024
ते म्हणाले की, माझ्या विधानासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात माझ्या टिपणीचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो आणि यापुढेही करत राहीन.