‘साधकाची भावभक्ती वाढल्यावर गुरुदेवांच्या कृपेने आध्यात्मिक प्रगती होईल’, असे निराशा आलेल्या साधकाला सांगणारे सनातनचे ७३ वे (समष्टी) संत पू. प्रदीप खेमका !

१. ‘आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, असे कळल्यावर साधकाला निराशा येणे

‘वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेला ‘माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, असे मला कळले. ‘माझी प्रगती झाली नाही. माझ्या जीवनातील एक वर्ष असेच निघून गेले’, असा विचार येऊन मला निराशा आली. २ दिवस माझ्या मनाची स्थिती तशीच होती.

२. पू. प्रदीप खेमका यांनी साधकाला आध्यात्मिक पातळीचा विचार करण्यापेक्षा गुरुदेवांप्रती भाव वाढवण्यास सांगणे

पू. प्रदीप खेमका

त्यानंतर गुरुदेवांच्या असीम कृपेने माझे मामा पू. प्रदीप खेमका यांनी माझी पत्नी सौ. मधुलिकाला काही सूत्रे सांगितली. पू. मामांनी सांगितले, ‘‘आध्यात्मिक पातळीचा विचार करण्यापेक्षा ‘आपली गुरुदेवांवर किती श्रद्धा वाढली आणि किती भाव वाढला ?’, असे बघायला पाहिजे. ते स्वतःचा संदर्भ देत म्हणाले, ‘‘गुरुदेवांनी मला संत म्हणून घोषित केले नव्हते, तेव्हाही माझा गुरुदेवांप्रतीचा भाव मुळीच न्यून झाला नव्हता.’’

३. ‘साधकाची भावभक्ती वाढल्यावर गुरुदेवांच्या कृपेने आध्यात्मिक प्रगती होईल’, हे शिकायला मिळणे

श्री. आकाश गोयल

पू. मामांच्या मार्गदर्शनामुळे माझी निराशा आणि नकारात्मकता दूर झाली. त्यांच्या मार्गदर्शक सूत्रांमुळे मला साधनेची दिशा मिळाली. ‘साधनेत भाववृद्धीचे महत्त्व असून साधकाची भावभक्ती वाढली, तर आध्यात्मिक प्रगती गुरुदेवांच्या कृपेने होणारच आहे’, हे मला शिकायला मिळाले.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची माझ्यासारख्या अज्ञानी बालकावर असलेल्या असीम कृपेबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– श्री. आकाश गोयल (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३९ वर्षे), आंध्रप्रदेश (२४.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक