Moodbidri River : मूडबिद्री (कर्नाटक) येथील नदीत सापडले गाय आणि वासरू यांचे शिर

मूडबिद्री (कर्नाटक) – कडंदले नदीत गाय आणि वासरू यांचे २ शिर आढळले. स्थानिकांच्या मते, गाय आणि वासरू यांची हत्या केल्यानंतर त्यांचे शिर नदीत फेकण्यात आले. या परिसरात अनधिकृत कसाईखाना आहे का ?, असा प्रश्‍न आता स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे. गोहत्या कुणी केली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.