MP Madarsa : मदरशांमध्ये मुसलमानेतर विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिल्यास मान्यता रहित होणार !

मध्यप्रदेश शासनाचा स्तुत्य निर्णय

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील भाजप शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मदरशांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात मुसलमानेतर किंवा मुसलमान विद्यार्थ्यांची नावे फसवी असल्याचे आढळून आल्यास किंवा मुलांना त्यांच्या पालकांच्या अनुमतीविना धार्मिक शिक्षण दिले जात असल्यास अशा मदरशांची मान्यता रहित केली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे की, राज्यातील मदरशांमध्ये सरकारी अनुदान मिळावे या हेतूने अनेक मुसलमानेतर मुलांची नावे विद्यार्थी म्हणून नोंदवून फसवणूक केली जाते. याची लवकर पडताळणी होणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

हा आदेश संपूर्ण देशासाठीच केंद्र सरकारनेच दिला पाहिजे आणि वस्तूस्थिती समोर आणली पाहिजे !