छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

(प्रतिकात्मक चित्र)

सातारा, १८ जुलै (वार्ता.) – शाहूपुरी येथे १० जुलै या दिवशी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. याविषयी मृत मुलीच्या भावाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

१ एप्रिल ते १० जुलै या कालावधीमध्ये संशयित सुभाष शिंदे (वय ४२ वर्षे) हा अल्पवयीन मुलीला भ्रमणभाषवर वारंवार संदेश पाठवून त्रास देत होता. तिचा पाठलाग करत होता. संदेशाला उत्तर दिले नाही, तर ‘तो संदेश तुझ्या मित्रांना दाखवीन’, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. वारंवार मानसिक त्रास देत संशयित १-२ वेळा घरीही येऊन गेला होता. त्यामुळे मुलीने त्रासाला कंटाळून रहात्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

संपादकीय भूमिका

महिलांसाठी असुरक्षित सातारा ! मुलांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करण्याऐवजी प्रतिकार करण्याची जिद्द मुलींनी स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक !