१. व्यवस्थित जेवूनही पुन्हा खावेसे वाटणे आणि थकवा येणे अन् नामजपादी उपाय केल्यावर अती खाण्याची इच्छा उणावणे
‘जुलै २०२३ मध्ये माझे वजन वाढले होते. मला काही प्रमाणात थकवाही जाणवत होता. माझे जेवण झाल्यावर आणि पोट भरलेले असूनही मला काही ना काही खावेसे वाटत असे. मला काही वेळा संयम ठेवता न आल्याने मी खात होते; मात्र मी व्यवस्थित खाऊनही मला थकवा जाणवत असे. असे २ – ३ वेळा झाल्यावर माझ्या लक्षात आले, ‘हा आध्यात्मिक त्रासाचा भाग असावा.’ मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या त्रासासाठी नामजपादी उपाय विचारले. त्यांनी मला २ घंटे ‘महाशून्य’ हा नामजप एक हात मानेच्या मागील बाजूस आणि दुसरा हात मणिपूर चक्रावर ठेवून करायला सांगितला. मी तसे करण्यास आरंभ केल्यावर तिसर्या दिवसापासून माझी खाण्याची इच्छा उणावत गेली. मला खावेसे वाटले, तरीही मी त्यावर संयम ठेवू शकले.
२. रक्त तपासणीच्या अहवालात ‘थायरॉइड ग्रंथीचा त्रास आहे’, असे निदान होणे आणि स्थुलातून निदान होण्यापूर्वीच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून साधिकेला असलेल्या त्रासाविषयी जाणून संबंधित ठिकाणी न्यास करायला सांगणे
त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये मी रक्ताची तपासणी करून घेतली. त्या अहवालात मला ‘थायरॉइड’ ग्रंथींचा त्रास असल्याचे निदान झाले. सद्गुरु गाडगीळकाकांनी मला शरिरात जेथे ‘थायरॉइड’ ग्रंथी असतात, त्याच्या मागील बाजूला न्यास करून नामजप करायला सांगितला होता. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मला होत असलेल्या त्रासाचे कारण स्थुलातून ऑक्टोबर २०२३ मध्ये समजले; मात्र सद्गुरु काकांना सूक्ष्मातून त्रासाचे कारण आधीच लक्षात आले होते.’ मला सद्गुरु काकांबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. ‘शारीरिक त्रासांवर औषधोपचार करणे, हे क्रियमाण वापरायचे आहे; मात्र साधनेच्या स्तरावर नामजपाने संबंधित त्रासांवर मात करणे अधिक परिणामकारक आहे’, याची मला प्रचीती आली.’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा. (१७.११.२०२३)
|