Neha Hiremath Murder Case : आरोपपत्रात लव्ह जिहादचा उल्लेख नाही, तर विवाहाला नकार दिल्याने हत्या केल्याचा आरोप

नेहा हिरेमठ हत्या प्रकरण

नेहा हिरेमठ व आरोपी फयाज

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – महानगरपालिकेचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची कन्या नेहा हिरेमठ हिच्या हत्येमागे ‘लव्ह जिहाद’ आहे, असे सांगत नेहा हिरेमठ हिचे वडील निरंजन हिरेमठ, भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी राज्यव्यापी आंदोलन केले होते; मात्र आता पोलिसांनी न्यायालयाला सादर केलेल्या आरोपपत्रात लव्ह जिहादचा कोणताही उल्लेख नाही. उलट विवाहाला नकार दिल्यामुळे नेहाची फयाज याने हत्या केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. ४७३ पानांच्या या आरोपपत्रात ९९ साक्षीदारांचा उल्लेख आहे. १८ एप्रिल या दिवशी दुपारी बीव्हीबी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थिनी नेहा हिची हत्या करण्यात आली होती.

नेहा हिरेमठ आणि आरोपी फयाज या महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होते. दोघांची आधी मैत्री होती. नंतर ते एकमेकांवर प्रेम करू लागले. मार्च २०२४ मध्ये  दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर नेहाने आरोपी फयाशी बोलणे बंद केले. त्यामुळे हताश झालेल्या फयाजने नेहाची हत्या केली.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यावर होत असलेला परिणाम जाणा !