Gaza School Attack : इस्रायलने गाझातील शाळेवर केलेल्या आक्रमणात २९ जणांचा मृत्यू

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीतील एका शाळेवर केलेल्या आक्रमणात २९ जणांचा मृत्यू झाला. या शाळेमध्ये निर्वासितांना ठेवण्यात आले होते, असे सांगण्यात येत असले, तरी ‘येथे हमासचे आतंकवादी लपले होते’, असे इस्रायलने म्हटले आहे. ४ दिवसांपूर्वीही इस्रायलने गाझातीलच एका शाळेवर असेच आक्रमण केले होते. यात १६ जणांचा मृत्यू झाला होता.

संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, गाझातील खान युनिसमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ द्यावा. या काळात इस्रायलने निर्वासितांवर आक्रमणे करू नयेत.

इस्रायलचे म्हणणे आहे की, त्याने आतापर्यंत हमासच्या २४ बटालियन नष्ट केल्या आहेत; मात्र अजूनही ४ बटालियन राफा शहरामध्ये लपून बसल्या आहेत. त्यांना नष्ट करण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे. (जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या संघटनेला कसे नष्ट करायचे ?, हे भारताने इस्रायलकडून शिकले पाहिजे ! – संपादक)