२३ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आतंकवादविरोधी शाखेने साईनाथनगर, निगडी येथून अनधिकृतरित्या वास्तव्य करणार्या ५ बांगलादेशींना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट (पारपत्र) सिद्ध करणार्या मध्यस्थाला अटक केली. त्याने ४२ बांगलादेशी नागरिकांना पारपत्र दिल्याचे सिद्ध झाले. त्यातील २३ घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. ती ४२ भारतीय पारपत्रे प्रशासनाने रहित केली आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा केला होता. (संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासह त्यांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक ! – संपादक)
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
राज्यातील सर्व ५२३ दस्त नोंदणी कार्यालये बंद !