आपत्काळाच्या संदर्भात सप्तर्षींनी दिलेले ज्ञान !

परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारकार्य समजावतांना सप्तर्षी म्हणतात, ‘‘आम्ही परमगुरुजींच्या सांगण्यावरून आता पंचमहाभूतांना आज्ञा दिली आहे की, आता तुमचा खेळ पृथ्वीवर चालू करा; मात्र परमगुरुजींच्या भक्तांना मात्र अपाय (पीडा) होणार नाही, याचे भान ठेवा.’’ (सर्वत्र चालू असलेली नैसर्गिक आपत्तींची मालिका पहाता आता प्रत्यक्षातही पंचमहाभूतांचा प्रकोप झाला आहे, हे लक्षात येते ! – संकलक)

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

१. जगात कितीतरी देश स्वतःला शक्तीशाली समजतात; पण येणार्‍या काळात नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक देश नष्ट होतील. येणार्‍या आपत्काळात डोळ्यांची पापणी लवेपर्यंत लाखो लोक मरतील.

२. हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी श्रीकृष्ण सर्वत्र युद्ध घडवून आणणार आणि भगवान शिव सर्वत्र व्याधी आणणार आहे. युद्ध आणि व्याधी यांमुळे दुष्प्रवृत्तींचा नाश झाल्यानंतर हिंदु राष्ट्र येईल.

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून) (२०.१२.२०२१)

कालमाहात्म्यानुसार वर्ष २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढणार असल्याने सनातनच्या सर्व साधकांनी प्रतिदिन पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावा. – पू. डॉ. ॐ उलगनाथन्

प्रतिदिन सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोरात घासावे, जेणेकरून दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये उष्णता निर्माण होईल. त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहून श्रीविष्णूचे स्मरण करून ११ वेळा ‘हरि ॐ निसर्गदेवो भव वेदम् प्रमाणम्’ हा मंत्र म्हणावा. कधी मुंगी, तर कधी हत्ती, कधी पक्षी, तर कधी प्राणी अशा कोणत्याही रूपात आम्ही सप्तर्षी साधक हा मंत्रजप करत आहेत ना ? याकडे लक्ष ठेवू.

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, (७.१.२०२४)