पुणे – मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत वारीमध्ये पायी चालत जाणार ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस थांबून, पालखीचे स्वागत करणार आहे; मात्र मी पालखीसोबत चालणार नाही, तर तिच्या स्वागतासाठी तिथे जाणार आहे, असे स्पष्टीकरण शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शरद पवार ७ जुलै या दिवशी तुकोबांच्या पालखीत वारकर्यांसोबत चालणार आहेत, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होत होती.