मुंबई – महाराष्ट्रात या वर्षी जानेवारी ते मे या काळात पाऊस पडला. या वेळी हानी झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ सहस्र ४३३ हेक्टर शेतीतील शेतपिकांची हानी झाली आहे. या हानीची भरपाई १५ जुलैपर्यंत करण्यात येईल, तसेच फळबागांच्या झालेल्या हानीसाठीही साहाय्य देण्यात येईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी २८ जून या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या घंट्यांत दिली.