हडपसर (पुणे) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाचा मोठ्या प्रमाणात छळ !

  • इमारतीत मोठ्याने नमाजपठण करून आणि एकादशीला घरासमोर मांसाहार ठेऊन हिंदु कुटुंबाला दिला मानसिक त्रास !

  • हिंदु कुटुंबाची पिण्याच्या आणि वापरायच्या पाण्याच्या नळजोडणी तोडली !

  • पोलिसांकडून पीडितांनाच प्रतिबंधात्मक नोटीस !

(प्रतिकात्मक चित्र)

हडपसर (जिल्हा पुणे), २३ जून (वार्ता.) – येथील ससाणेनगर साई व्हिला इमारतीत गायकवाड नावाचे कुटुंब वर्ष २०१७ पासून रहात आहे. त्यानंतर तांबोळी नावाच्या मुसलमान व्यक्तीने इमारतीतील ७ सदनिका खरेदी करून त्या मुसलमान कुटुंबांना भाड्याने दिल्या. त्यानंतर बाहेरील लोकांचे मोठे गट इमारतीच्या आत मोठ्याने नमाजपठण करू लागले. याविषयी गायकवाड दांपत्याने तक्रार केली असता दांपत्याला गंभीर मारहाण करण्यात आली. (यावरून धर्मांधांना पोलिसांचा जराही धाक नसल्याचे दिसून येते. हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) यावर हे दांपत्य तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांना न्याय देण्याऐवजी पोलिसांकडून उलट त्यांनाच प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली. त्यानंतर तांबोळी यांनी त्या कुटुंबाचे गायकवाड यांच्या सदनिकेच्या पिण्याच्या आणि वापरायच्या पाण्याची नळजोडणी तोडली. एकादशीच्या दिवशी या हिंदु कुटुंबाच्या घरासमोर मांसाहार ठेवला जात असे. गायकवाड यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी धर्मांधांकडून ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात आले होते. याविषयी पुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, ‘तांबोळी आमचे ऐकत नाहीत’, असे पोलिसांनी सांगितले. (असे पोलीस कायदा आणि सुव्यसव्था काय राखणार ? हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस मुसलमानांसमोर गुडघे टेकतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

हिंदु कुटुंब जगत आहे भयग्रस्त जीवन !

आज गायकवाड कुटुंब भयग्रस्त जीवन जगत असून ते सदनिका विकून त्या परिसरातून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. (पोलिसांच्या असहकार्यामुळेच हिंदू भयग्रस्त जीवन जगत आहेत. अशा पोलिसांवर कारवाई होण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची प्रवृत्ती असलेले पोलीस ! सरकारने अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !
  • हा लँड जिहादच नव्हे का ? गड दुर्ग, मंदिरे बळकावणार्‍या धर्मांधांची मजल आता हिंदूंची घरे आणि जागा बळकावण्यापर्यंत जाणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे !