रक्ताचा थेंबही न सांडता निजामाला केले होते पराभूत !

पुणे – वर्ष १७२८ मध्ये पालखेडच्या लढाईमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडील मराठा सैन्य निजामाच्या सैन्याहून अधिक होते; मात्र पेशव्यांनी निजामाच्या सैन्याचे पाणी रोखले. संपूर्ण रसद तोडून निजामाला कोंडीत पकडले. निजामाला शरण येण्यास भाग पाडले आणि तहास मान्यता द्यावी लागली. रक्ताचा थेंबही न सांडता जिंकलेल्या ऐतिहासिक लढाईच्या ठिकाणी आता थोरले बाजीराव पेशवे यांचे स्मारक निर्माण करण्यात येत आहे. ‘पालखेड स्मारक समिती’ला याविषयीची अनुमती मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची कल्पना समितीने दीड वर्षापूर्वी मांडली होती. जिल्हाधिकार्यांनी समितीला आवश्यक त्या अनुमती दिल्या आहेत. स्मारकाच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल. स्मारकासाठी पालखेड ग्रामपंचायतीने जागा दिली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !