
मुंबई – मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्या २ बांगलादेशी घुसखोरांच्या आतंकवादविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. बनापट पारपत्राद्वारे भारतात येऊन या घुसखोरांनी जोगेश्वरी लोकसभा मतदारसंघात मतदान केल्याचे आढळून आले आहे.
मुंबईत काही बांगलादेशी अवैधरित्या रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आतकंवादविरोधी पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. रियाज हुसेन शेख, सुलतान सिद्धीक शेख, इब्राहिम शफिउल्ला शेख, फारूख उस्मानगणी शेख अशी घुसखोरांची नावे आहेत. या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य ५ जणांनी बनावट पारपत्रांद्वारे भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. त्यांमधील एक जण नोकरीसाठी सौदी अरेबिया येथे गेल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात आढळून आले आहे. पोलीस अन्य बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाआज बांगलादेशी घुसखोरांनी मतदान केले, उद्या त्यातीलच एखादा उमेदवार झाल्यास नवल ते काय ? |
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !