बदलापूर (जिल्हा ठाणे) येथे मनुस्मृतीचे भित्तीपत्रक जाळल्याच्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांची मागणी
बदलापूर – राज्यात गेल्या महिन्यात शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश केल्याने ‘मनुस्मृति’ हे केवळ नाव पाहून अनेक धर्मनिरपेक्षतावादी राजकारण्यांनी याविषयी जातीयवाद आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बदलापूर (पश्चिम) येथील रमेशवाडी परिसरात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी पदाधिकार्यांसह मनुस्मृतीची भित्तीपत्रके जाळून सत्ताधार्यांवर संघाची विचारसरणी लहान मुलांवर लादण्याचा आरोप केला. याविषयी येथील स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस ठाण्यात जाऊन धार्मिक ग्रंथाचा अनादर केल्याप्रकरणी आणि छायाचित्र जाळल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
संपादकीय भूमिका
|