पशूकल्याण संस्थेने सांगितले आहे, ‘‘देशात विकले जाणारे दूध आणि दुग्धपदार्थ यांत ६८ टक्क्यांहून अधिक पदार्थ, खाद्यसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे (FSSAI द्वारे) निर्धारित मान्यतांना पूर्ण करत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जर अशा प्रकारची भेसळीची पडताळणी लवकर केली नाही, तर वर्ष २०२५ पर्यंत भारतात ८७ टक्के लोक कर्करोगाने पीडित होतील.’’
सणासुदीच्या काळात जेव्हा दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा मोठ्या स्तरावर भेसळ केली जाते. त्या वेळी दूध आणि दुधापासून बनवलेली अन्य उत्पादने, तसेच मिठाई यांचे सेवन करणे घातक होऊ शकते. दुधाचे जेवढे उत्पादन होत नाही, त्यापेक्षा अधिक दुग्ध-उत्पादनांची निर्मिती होते. लोक मोठ्या प्रमाणात मिठाई विकत घेतात. सर्वसामान्य दिवसांमध्येसुद्धा दुग्धालयातून किंवा घरोघरी जाऊन दूध विकणार्यांकडून जे लोक दूध विकत घेतात, तेही भेसळयुक्त असते. लहान मुले आणि कुटुंबातील वृद्ध सदस्य यांना दूध अवश्य दिले जाते. त्यातून त्यांना पोषण मिळते. भेसळीचे दूध असल्यामुळे त्यांची हानी होते. ही हानी त्वरित दिसून येत नाही. भेसळीच्या दुधात सावकाश भिनणारे विष असते. ते दीर्घकाळानंतर शरिराच्या महत्त्वपूर्ण अवयवांची कार्यप्रणाली आणि कार्यक्षमता यांवर वाईट परिणाम करते.