द्रमुकच्या कार्यकर्त्यांचे कृत्य !
चेन्नई – लोकसभेचे निकाल समोर आल्यानंतर तमिळनाडूमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते अण्णामलाई यांचे छायाचित्र बकर्याच्या गळ्यात बांधून त्या बकर्याचा भर रस्त्यात धारदार शस्त्राने एका घावात शिरच्छेद केल्याचे दिसत आहे. यानंतर सर्व जण आनंद साजरा करतांना दिसत आहे. यावर लोकांनी ‘हा प्रकर म्हणजे क्रूरता नव्हे का ?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामध्ये सहभागी असणार्या द्रमुकच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणीही लोकांनी केली आहे.
द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी अण्णामलाई यांच्या पार्श्वभूमीचीही खिल्ली उडवली. अण्णामलाई हे शेतकरी कुटुंबातील असून शेळीपालनही करतात. याच कारणामुळे ज्या बकर्याचे शिर कापले, बकर्याच्या गळ्यात त्यांचे चित्र बांधले होते.
याआधी २०२२ मध्ये कर्नाटकातील बेळगावी येथे भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा पुतळा बनवून तो रस्त्यात लटकवण्याची घटना घडली होती.
संपादकीय भूमिकाउद्या अशा हिंस्र प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षातही कुणा व्यक्तीचा अशा प्रकारे शिरच्छेद केल्यास आश्चर्य वाटू नये ! क्रूरतेची परिसीमा गाठणार्या द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे. द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या क्रूरतेविषयी प्राणीप्रेमी संघटना गप्प का ? |