मुसलमान युवकांनी गोंधळ घालत ३ पोलिसांना केले घायाळ !

कराड येथे मुसलमानांचा पोलीस-प्रशासनासमवेत वाद !

कराड, ७ जून (वार्ता.) – येथील शनिवार पेठेतील मक्का मशिदीजवळ पोलीस प्रशासनाच्या जागेत संरक्षक भिंत बांधण्याचे काम चालू आहे. हे काम चालू असतांनाच या जागेतील रस्त्यावरून मुसलमान समाजाने पोलीस प्रशासनासमवेत वाद घातला. मुसलमान समाजातील काही युवक आणि महिला यांनी गोंधळ घालत संरक्षक भिंतीचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी दगडफेक करत पोलिसांसमवेत झटापटही झाली. यामध्ये ३ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. (लँड जिहादच्या तडाख्यातून शासकीय जागाही सुटलेल्या नाहीत, याचेच हे उदाहरण असे खेदाने म्हणावे लागेल. पोलीस प्रशासन स्वत:च्या खात्यातील जागेत भिंत बांधतांना धर्माधांचा मार खातात, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

शनिवार पेठेत तहसील कार्यालयाजवळ पोलीस प्रशासनाची जागा आहे. या जागेची रीतसर मोजणीही झाली आहे. ५ जून या दिवशी पोलीस प्रशासनाने या जागेत संरक्षक भिंत बांधण्यास प्रारंभ केला; मात्र मुसलमान समाजाने रस्त्याच्या कारणावरून या कामास विरोध करत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. नंतर मुसलमानांनी पोलीस प्रशासनासोबत बैठक घेत काही अवधी मागून घेत ‘या कामाला वरिष्ठ पातळीवरून स्थगितीचा आदेश आणण्याचा प्रयत्न करणार’, असे सांगितले. या प्रश्नी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस यांना स्थळाची पहाणी करण्यासाठी कराडला पाठवले होते; मात्र ६ जूनच्या दुपारपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कोणतेही आदेश न आल्यामुळे १ वाजता पोलीस प्रशासनाने पुन्हा संरक्षक भिंतीच्या कामासाठी खोदकामास प्रारंभ केला. तेव्हा काही मुसलमान युवक आणि महिला यांनी गोंधळ घातला.