डी.एन्.ए. चाचणीद्वारे ५ जणांची ओळख पटली
डोंबिवली – येथील एम्.आय.डी.सी.त झालेल्या स्फोटाला १५ दिवस होऊनही अजून काही जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी सापडलेल्या २५ ते ३० मानवी अवशेषांच्या डी.एन्.ए. पडताळणीची प्रक्रिया करण्यात आली होती. त्यात बेपत्ता झालेल्यांपैकी ५ कामगारांची ओळख पटली आहे. त्यांचे मृतदेह संबंधित नातेवाइकांकडे सोपवले आहेत. अजून ४ कामगार बेपत्ता आहेत.