१० जून या दिवशी आनंदराज आंबेडकर यांच्या मनुस्मृती दहनाला अनुमती देऊ नये ! – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख

आनंदराज आंबेडकर

पनवेल – रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे १० जून या दिवशी महाड येथे मनुस्मृती दहन करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या कार्यक्रमाला अनुमती दिल्यास राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. दहनाच्या वेळी जर काही गंभीर प्रकार घडला, तर त्याला प्रशासन आणि पोलीस यंत्रणा उत्तरदायी असतील. त्यामुळे या कार्यक्रमाला अनुमती देऊ नका, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त यांना पाठवले आहे.