Illegal Cattle Trafficking In Karnataka : कर्नाटकात गोवंशियांची बेकायदेशीर वाहतूक आणि त्यांची हत्या करणारे २ धर्मांध पसार !


बेळ्तंगडी – जिल्ह्यातील कराय येथील सिराज हा बेकायदेशीररित्या गोवंशियांची हत्या करून मांस विकत असल्याचे आणि पुत्तिल गावातील अश्रफ हा जनावरांची बेकायदेशीररित्या वाहतूक करतो, अशी माहिती पुंजालकट्टे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उदयरवी पै यांना मिळाली. पोलीस या दोघांच्या घरी पोचल्यावर ते पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

१. पोलीस अश्रफ याच्या घरी पोचले. त्या वेळी अश्रफ वाहनातून जनावरांना उतरवत होता. पोलिसांना पाहून तेथून तो तेथून पळून गेला. पोलिसांनी २ जनावरे, तसेच वाहतूक करणारे वाहन आणि वाहनातील भ्रमणभाष जप्त केला आहे.

२. त्यानंतर पोलसी गोवंशियांची हत्या करणार्‍या सिराज याच्या घरी जाताच तो पसार झाला. त्याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये जनावरांचे मांस, त्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि इतर वस्तू सापडल्या आहेत. पोलिसांनी त्या कह्यात घेतल्या असून अश्रफ आणि सिराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात धर्मांधांना चुचकारणारे काँग्रेस सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांध मोकाट आहेत, हे जाणा !