प्रवेशद्वाराचा रस्ता रिक्शाचालकांनी अडवल्याने प्रवाशांची गैरसोय !

पनवेल रेल्वेस्थानक परिसरातील प्रकार !

पनवेल – पनवेल रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर तीन आसनी रिक्शाचालक रस्ता अडवून ठेवतात. त्यामुळे प्रवाशांची पुष्कळ गैरसोय होत आहे. खासगी वाहनांतून तेथे उतरणेही अवघड झाले आहे. खासगी चारचाकी किंवा ॲपआधारित वाहनचालकांना हे रिक्शाचालक जाणीवपूर्वक आत जाऊ देत नाहीत. त्यामुळे सामान घेऊन आलेल्या प्रवाशांची धांदल होते. ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी यांचेही हाल होतात. पनवेल रेल्वेस्थानक परिसरात पाकीटमारीच्या घटनाही वाढत आहेत.

संपादकीय भूमिका

रेल्वे प्रशासन या संदर्भात निष्क्रीय कसे ? उद्दाम रिक्शाचालकांवर कठोर कारवाई कधी होणार ?