इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. पार्थ चव्हाण

तासगाव (जिल्हा सांगली) – येथील सनातनचा साधक कु. पार्थ प्रदीप चव्हाण याने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९२.४० टक्के गुण प्राप्त केले आहेत. तो अभ्यास करण्यापूर्वी प्रार्थना करत असे. त्यामुळे अभ्यास एकाग्रतेने आणि मनापासून झाला. कु. पार्थ हा प्रासंगिक सेवा करतो.

कु. वरद भंडारे

सातारा – येथील वडूज केंद्रातील सनातनचा साधक कु. वरद भंडारे याने इयत्ता १० च्या परीक्षेमध्ये ९१.४० टक्के गुण प्राप्त केले आहेत. कु. वरद वडूज केंद्रातील सनातनचे साधक श्री. विनोद भंडारे यांचा मुलगा आहे. वरद अभ्यासाला प्रारंभ करतांना नियमितपणे श्री गणपति आणि श्री सरस्वतीदेवीला प्रार्थना करत असे.

कु. राम आचार्य

मिरज (जिल्हा सांगली) – येथील सनातनचे साधक कु. राम राघवेंद्र आचार्य याला इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत ९१.१७ टक्के आणि जेईई-मेन परीक्षेत ९५.९३ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

सर्व विद्यार्थी साधकांनी या यशाचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे. सर्वांचा त्यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक