पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. मृणाल मनमाडकर हिला इयत्ता १० वीच्‍या सी.बी.एस्.ई. परीक्षेत ९१ टक्के गुण !

कु. मृणाल मनमाडकर

पुणे, २८ मे (वार्ता.) – येथील सनातनची साधिका कु. मृणाल मंदार मनमाडकर हिला इयत्ता १० वीच्‍या सी.बी.एस्.ई. परीक्षेत ९१ टक्‍के गुण मिळाले आहेत. ती ‘पोद्दार इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिकत होती. वर्षभरामध्ये मृणाल प्रार्थना करणे, नामजप करणे आदी कृती नियमित करत होती. तसेच प्रासंगिक सेवांमध्ये ती सहभाग घेत होती. यामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गामध्ये प्रात्यक्षिक दाखवणे, ऑनलाईन सेवा, सनातनची सात्त्विक उत्पादने देणे या सेवा ती करत आहे. ‘हे यश मिळवणे गुरुदेवांच्‍या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे शक्‍य झाले’, असे तिने सांगितले.

कु. चिन्मय मुजुमले याला दहावीत ९१.४० टक्‍के गुण प्राप्त !

कु. चिन्मय मुजुमले

पुणे येथील सनातनचा साधक कु. चिन्मय चिंतामणी मुजुमले याला दहावी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेत ९१.४० टक्‍के गुण मिळाले आहेत. तो ‘श्री संत तुकाराम इंग्लिश स्कूल’ येथे शिकत होता. चिन्मय नियमितपणे ऑनलाईन सेवा करतो. त्याच्या वडिलांच्या समवेत साप्ताहिक आणि दैनिक वितरण या सेवेमध्ये साहाय्य करतो. त्याने अथर्वशीर्ष पठण २ महिने केले. तो नियमित नामजपादी उपाय आणि भावप्रयोग करत असतो. ‘हे यश मिळवणे गुरुदेवांच्‍या कृपेमुळे शक्‍य झाले’, असे त्याने सांगितले.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक