परात्पर गुरु डॉ. आठवले आणि बाळासाहेब विभूते यांच्यात झालेले संभाषण आणि त्यांनी बाळासाहेब विभूते यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

देवद येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे) यांचे १४ मे २०२४ या दिवशी निधन झाले. २४ मे या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्या निमित्ताने हे लिखाण देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. बाळासाहेब विभूते यांनी त्यांना आलेली अनुभूती सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘डोळे बंद करून काय जाणवते ?, ते अनुभवण्यास सांगणे

बाळासाहेब विभूते : नमस्कार गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उद्देशून) ! तुमच्या प्रीतीमुळे तुम्ही आम्हा विभूते कुटुबियांना तुमच्या चरणांशी घट्ट बांधून ठेवले आहे. तुम्ही येथे येण्यापूर्वी सूक्ष्मातील प्रयोग घेतले. त्या वेळी तुमचे छायाचित्र पाहिले. तेव्हा त्यातून लाल प्रकाश माझ्याकडे प्रक्षेपित होत होता. तो प्रकाश माझ्या हृदयात जात होता. ’, अशी मला अनुभूती आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले : (सर्वांना थांबवून) सगळ्यांनी डोळे मिटा आणि श्वास घ्या. मी डोळे उघडायला सांगितल्यावर उघडा. सात-आठ वेळाच श्वास घ्यायचा आहे आणि ‘काय वाटते ?’, ते सांगायचे.

कै. बाळासाहेब विभूते

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयोग केल्यावर साधकांना सुगंधाची अनुभूती येणे

एक साधक  : (डोळे उघडायला सांगितल्यावर) मंद सुगंध येत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : किती जणांना सुगंध आला ? (बर्‍याच जणांनी हात वर केले.) फारच छान !

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री. बाळासाहेब विभूते यांच्या बोलण्यामुळे साधकांना पंचतत्त्वांच्या अनुभूती येत असल्याचे सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले : सुगंधाशिवाय निराळे काही जाणवले असेल, तर सांगा कुणी.

श्री. अभिजीत (बाळासाहेब विभूते यांचा मोठा मुलगा) : शांत वाटले आणि ‘ॐ ॐ’ असा आवाज येत होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अच्छा !

दुसरा साधक : प.पू. डॉक्टर, मला पोकळी जाणवली. ‘महाविष्णु आमच्या समोर आहे. मी आणि सर्व साधक लहान आहोत’, असे मला दिसले. देव आणि भक्त यांचा मौनातून जो संवाद असतो, तो मला अनुभवता आला. ‘मी तुमच्या चरणांच्या पुष्कळ जवळ आहे’, असे मला वाटले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : (बाळासाहेब विभूते यांना उद्देशून) तुम्हाला ठाऊक होतं का ?, तुम्ही बोलतांना असा परिणाम होतो. खूप छान आहे. थोडक्यात तुम्ही बोलतांना सर्वांनाच दृश्ये दिसली आणि पंचतत्त्वांच्या अनुभूती आल्या.

श्री. अभिजीत विभूते

४. साधकांना आलेल्या विविध अनुभूती ऐकून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बाळासाहेब विभूते यांना त्यांचे बोलणे सर्वांपर्यंत पोचवण्यास सांगणे

तिसरा साधक : जेव्हा डोळे बंद केले, त्या वेळी आनंदाच्या लहरी सगळीकडे जाणवल्या. तेव्हा छान आणि एकदम शांत वाटले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : (बाळासाहेब विभूते यांना उद्देशून) तुम्ही स्वतःतच साठवून ठेऊ नका. सगळीकडे बोलणे जाऊ दे तुमचे. फारच छान ! बोला आता पुढचे.

५. बाळासाहेब विभूते यांनी अनुभूतींचे कर्तेपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले अनुभूती येण्यामागील शास्त्र

बाळासाहेब विभूते : तेच मला आता एकदम लक्षात आले. ‘गुरुदेवा, प्रचार करतांना समाजातील व्यक्ती विरोध न करता ऐकून घेत, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होत, सात्त्विक उत्पादने घेत’, हे सर्व तुम्हीच माझ्याकडून करून घेत होता. ‘स्थूल देहा असे स्थळ काळाची मर्यादा ।’ या वाक्याची प्रचीती आली. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवणारे तुम्हीच आहात. आम्ही नाममात्र आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : (सर्वांना थांबवून) या अनुभूतींमागील शास्त्र सांगतो. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंचतत्त्वे सगळी एकत्रच असतात. त्यात एखादे तत्त्व अधिक किंवा अल्प प्रमाणात असते. पृथ्वीतत्त्व म्हणजे जो धूर असतो तो. आपतत्त्व म्हणजे जल. तेजतत्त्व म्हणजे प्रकाश. वायूतत्त्व म्हणजे स्पर्श आणि आकाशतत्त्व म्हणजे नाद. आपल्याला अशा सगळ्या अनुभूती येत असतात. एखादे तत्त्व साधनेने प्रगट झाले, तर त्याच्या समवेत बाकीचीही हळूहळू आपल्याला जाणवू लागतात. त्याचप्रमाणे बाळासाहेब विभूते यांच्यात एक तत्त्व प्रगट झाल्यावर तुम्हाला निरनिराळ्या आणि तुमच्या स्तराप्रमाणे अनुभूती आल्या.

६. मोठ्या मुलाने सर्वतोपरी साहाय्य करणारे आई-वडील मिळाले; म्हणून कृतज्ञता व्यक्त केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बाळासाहेब विभूते यांचे कौतुक करणे

श्री. अभिजीत : गुरुदेव, एक सांगायच होते. मला आई-वडील, सासू-सासरे, पत्नी यांनी साधनेसाठी साहाय्य केले; म्हणून मी इकडे येऊ शकलो, यासाठी कृतज्ञता वाटते. असे क्वचितच भेटतात ! त्यासाठी कृतज्ञता वाटते. वडील आताही म्हणतात, ‘‘तू साधना कर ! तुला काही लागले, तर ते मी देतो.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले : असे म्हणतात !

श्री. अभिजीत : हो. ते प्रत्येक मासाला मला काही लागत असेल, तर देतात. काही आर्थिक साहाय्य हवे असेल, तर ते करतात. मला साधनेत काही अडचणी आल्या असतील, तर त्या मी त्यांना सांगतो. माझ्या मनाची स्थिती सांगतो. ते मला साधनेत साहाय्य करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : किती नशीबवान आहात तुम्ही. असे किती जण आहेत समाजात !