Haj Committee : राज्य हज समितीच्या ४ महिन्यांच्या खर्चासाठी ४० लाख रुपये निधी !

संग्रहित चित्र

मुंबई – महाराष्ट्र राज्य हज समितीला एप्रिल ते जुलै २०२४ या ४ महिन्यांच्या कार्यालयीन व्ययासाठी राज्य सरकारने ४० लाख १९ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे. या निधीपैकी ४० लाख रुपये हज समितीकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे.