मुंबई – वर्साेवा मतदान केंद्रांच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. मतदानाची स्लीप मिळत नसलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून स्लीप मिळवून देण्यासाठी साहाय्य करत असल्याची भूमिका या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मांडली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर हा वाद मिटला.