पणजी, १७ मे (वार्ता.) – सांत इनेझ, पणजी येथील काकुलो मॉलजवळील श्री ताडमाड शिव मंदिराची दानपेटी फोडून आतील रक्कम अज्ञातांनी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. १६ मे या दिवशी मंदिराच्या समोर रात्री उशिरापर्यंत ‘स्मार्टसिटी’चे काम चालू होते आणि हे काम रात्री संपल्यानंतर मंदिरात चोरी करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. १७ मे या दिवशी सकाळी मंदिरात पुजारी आले असता त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे समजले. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. हल्ली चोरट्यांनी राज्यात अनेक ठिकाणी मंदिरे, तसेच मुरगाव परिसरातील शाळा यांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षितच ! |