|
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशामधील देवरिया जिल्ह्यातील गौरीबाजार येथे रहाणार्या एका मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे खोटेच सांगून कुशीनगर जिल्ह्यातील हाता परिसरात रहाणार्या एका १५ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर एक दिवस आरोपी तरुणाने पीडित मुलीला भेटण्याच्या बहाण्याने गोरखपूरला बोलावले आणि तिचे अपहरण करून तीन महिने तिला घरात डांबून ठेवले. पीडित मुलीच्या पालकांनी कुशीनगर जिल्ह्यातील हाता पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला; परंतु पुढे आरोपीच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
नंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस उपमहानिरीक्षकांची भेट घेतली आणि कोणतीही कारवाई होत नसल्याविषयी त्यांच्याकडे खंत व्यक्त केली. त्यांनी हे प्रकरण गोरखपूर पोलिसांकडे हस्तांतरित केले आणि १२ मे या दिवशी त्याचे अन्वेषण वरिष्ठ पोलीस अधीक्षक अंशिका वर्मा यांच्याकडे सोपवले. त्यांनी पाळत ठेवून १४ मे या दिवशी आरोपीला रेल्वे स्थानकाजवळून कह्यात घेतले आणि पीडित मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशामध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध त्याला जुमानत नसणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! सरकारनेच आता लव्ह जिहाद रोखण्यासाठी ठोस कृती केली पाहिजे, असे जनतेला वाटते ! |