बीदर (कर्नाटक) – येथील बसवकल्याण येथे असलेल्या पार्कमध्ये एका हिंदु युवकासमवेत असलेल्या मुसलमान युवतीवर काही युवकांनी आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. हिंदु युवक रिक्शाचालक असून महिलेचे त्याच्याशी अनैतिक संबंध आहेत. ती मुसलमानांना अपकीर्त करत आहे, अशा प्रकारे आरोप करून या युवकांनी महिलेवर आक्रमण केले. या आक्रमणाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसृत होत आहेत.
याआधी ८ जानेवारी २०२४ या दिवशी राज्यातील हावेरी शहरातही अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. यामध्ये हावेरी जिल्ह्यात असलेल्या हानगल तालुक्यात हिंदु युवक आणि मुसलमान युवती एका खासगी हॉटेलमध्ये उतरले होते. ही माहिती स्थानिकांना समजताच काही मुसलमान युवकांनी त्यांच्यावर आक्रमण करून युवतीला पळवून नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. थोडक्यात हिंदु युवकांसह दिसणार्या मुसलमान मुली अथवा महिला यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाएरव्ही लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या हिंदु महिलेचे रक्षण करण्यासाठी हिंदु युवक पुढे सरसावल्यास त्यांना ‘प्रेमाला धर्माचा रंग देऊ नये’, अशा प्रकारचे उपदेशाचे डोस पाजणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ? |