‘पाश्चिमात्य देशांमध्ये अतिभौतिकवादामुळे मानसिक अशांती, घोर निराशा इत्यादी विकृतींनी घर केले आहे. विलासिता, मांस, मदिरा (मद्य) आणि आधुनिक सुखसुविधा मानवाला खरी सुखशांती नाही; परंतु अशांती प्रदान करतात, तसेच मानवातून दानव बनवण्याचेच कारण बनतात. पाश्चिमात्य देशांमध्ये संस्कृतीच्या नावाखाली वाढलेल्या विकृतींमुळेच बलात्कार, अपहरण आणि आत्महत्या इत्यादी घटना प्रतिदिन वाढतच आहेत. ‘अध्यात्मशून्य जीवनामुळे मानवाचे कल्याण अशक्य आहे, हा अनुभव विदेशी विचारवंत आणि बुद्धीजीवी लोकांनी ५० वर्षांपूर्वीच घेतला होता. त्यांना हे चांगल्या प्रकारे समजले होते की, अध्यात्मवाद आणि आस्तिकतेविना जीवन व्यर्थ आहे. अनेक विदेशी विद्वान भौतिकवादाच्या झगमगाटापासून मुक्त होऊन अध्यात्मवादाला शरण गेले.’
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)