(म्हणे) ‘जर प्रश्‍नपत्रिका बनवणारे उच्च जातीचे असल्याने दलित अयशस्वी होतात !’ – राहुल गांधी, काँग्रेस

काँग्रेसचे राहुल गांधी यांची ‘फोडा आणि राज्य करा’ची हिंदुविघातक नीती !

राहुल गांधी

नवी देहली – स्पर्धा परीक्षांमध्ये वंचित वर्ग, अनुसूचित वर्ग आणि उच्च वर्णीय जाती यांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. याविषयीचा त्यांचा एक व्हिडिओ ‘एक्स’वरून प्रचंड प्रमाणात प्रसारित झाला आहे. व्हिडिओमध्ये गांधी काही लोकांशी बोलत असतांना संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उभे करतांना म्हणतात की, परीक्षेत उच्च जातीचे लोक प्रश्‍नपत्रिका काढतात. त्यामुळे दलित जातीतील लोक नापास होतात.याविषयी गांधी यांनी अमेरिकेत कृष्णवर्णीय आणि गोरे यांच्यात दीर्घकाळ चालत आलेल्या अशा भेदभावाचे उदाहरण देऊन सर्वसामान्यांना समजावतांना व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ ‘मेघ अपडेट्स’ या ट्विटर खात्यावरून ६ मेच्या दुपारी प्रसारित झाला असून त्याला १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

व्हिडिओमध्ये राहुल गांधी पुढे म्हणत आहेत की, आता समजा तुम्ही एका शेतकर्‍याचा मुलगा आहात आणि मी नोकरशहाचा ! तुम्ही प्रश्‍नपत्रिका काढली, तर मी नक्कीच नापास होईन आणि मी प्रश्‍नपत्रिका काढली, तर तुम्ही नापास व्हाल ! याचा अर्थ गुणवत्तेचा प्रश्‍न नसून तुमच्या वर बसलेला कोण आहे, हे महत्त्वाचे आहे.

संपादकीय भूमिका 

प्रथम देशातील मुसलमानांना आणि आता अनुसूचित जातीतील हिंदूंना स्वत:च्या बाजूने वळवण्यासाठी राहुल गांधी यांनी चालवलेला प्रयत्न लांच्छनास्पद आहे. भारतियांनो, अशा काँग्रेसला आता कायमचे घरी बसवण्याचा प्रण घ्या !