Azerbaijan Threatens India : (म्हणे) ‘आम्ही शांत बसू शकत नाही !’ – पाकचा मित्र अझरबैजान याची धमकी

भारत आणि आर्मेनिया यांच्यातील मैत्री पाहून पाकचा मित्र अझरबैजान याची धमकी

अर्मेनिया चे पंतप्रधान निकोल पाशिन्यान व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (डावीकडे) अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव (उजवीकडे)

बाकू (अझरबैजान) – फ्रान्स, भारत आणि ग्रीस आमच्या विरोधात आर्मेनियाला साहाय्य करत असतांना आम्ही शांत बसू शकत नाही. हे ते उघडपणे करत आहेत. साहजिकच ते यातून काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही शांत बसू शकत नाही, अशी धमकी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी दिली. अझरबैजान पाकिस्तानचा मित्र देश असून त्याने पाकला काश्मीरवरून समर्थन दिले आहे. यामुळेच भारत अझरबैजानचा शत्रू आर्मेनियाला सर्व प्रकारचे साहाय्य करत आहे.

अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन्ही देशांशी भारताचे राजनैतिक संबंध आहेत. वर्ष २०२२ मध्ये भारताने अर्मेनियाला ‘पिनाका’ मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर, रणागाडाविरोधी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवण्यासाठी करार केला होता. काश्मीरविषयीच्या भारताच्या भूमिकेला आर्मेनियाचा पाठिंबा आहे.

संपादकीय भूमिका

अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’, असे भारताने अझरबैजान या इस्लामी देशाला सुनावले पाहिजे !