मुसलमानांच्या मतांवर जगणार्या काँग्रेसच्या एका नेत्याचे निलाजरे विधान !

चित्रदुर्ग (कर्नाटक) – मुसलमानांना भाजप मानसिक त्रास देत आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अलीकडेच केले होते. या वक्तव्याचे कर्नाटकातील माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच्. आंजनेय यांनी चित्रदुर्ग येथे बोलतांना समर्थन केले. ते म्हणाले की, कुणी कितीही त्रास दिला, तरी देशात वास करणार्यांनी देश सोडून जायचा प्रश्नच उद्भवत नाही. येथे रहाणारे सर्वजण एकाच आईची मुले आहेत. मुसलमानांनीही स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. ब्रिटीश गोळ्या घालतांना हा मुसलमान, शीख, लिंगायत, ब्राह्मण असे म्हणायचे का ? ब्रिटिशांना हाकलतांना सर्वाधिक बलीदान मुसलमानांनीच दिले आहे.

आंजनेय पुढे म्हणाले की, आम्हीच देश उभा केला. आम्हीच जिंकू, आम्हीच देशावर राज्य करू ! (दिवास्वप्नात वावरणारे आंजनेय ! – संपादक) ७५ टक्के हिंदू आमच्या बाजूने आहेत. मुसलमानांना भाजपकडून काहीही नको; परंतु हिंदूंना भाजपने काय दिले ? हिंदू असा शब्द सांगून त्याने हिंदूंना मागे रेटले आहे.
In India’s freedom struggle, most sacrifice made by Muslims ! – H Anjaneya, Congress Leader and Former Minister, Karnataka
A shameless statement made by a leader of #Congress – a party whose whole existence depends on the Mu$l!m votebank !
If Mu$l!ms sacrificed the most in… pic.twitter.com/GQrxlElnlQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2024
संपादकीय भूमिकाजर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलीदान मुसलमानांनी केले, तर त्यांनी देशाचे विभाजन का होऊ दिले ? अशी संतापजनक वक्तव्ये करून काँग्रेस हिंदूंनी केलेल्या त्यागाचा अवमानच करत आहे. हिंदू अशा काँग्रेसला कधीच विसरणार नाहीत ! |
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक